PM Narendra Modi And Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची केली विचारपूस
PM Narendra Modi And Sharad Pawar : शरद पवारांना तातडीने काल बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

PM Narendra Modi And Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल ९ फेब्रुवारी यांना बारामतीमधून पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याची माहिती दिली होती.
यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काल सुप्रिया सुळे यांनी पोस्टद्वारे सांगितले होते की, “बाबांना छातीत संसर्ग झाला आहे. त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सुदैवाने, त्यांचे इतर सर्व रिपोर्ट्स सामान्य आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार.”
उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
शरद पवारांना मागील काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच कफ आणि खोकल्याचा त्रास वाढला. हा त्रास अधिक जाणवू लागल्याने शरद पवारांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुठली ही काळजी करायची गरज नाही, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित लोढा यांनी दिली आहे. PM Narendra Modi And Sharad Pawar
आज सकाळी देखील शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार असल्याची शक्यता आहे. PM Narendra Modi And Sharad Pawar
हेही वाचा :






