PM मोदींचा हल्लाबोल,’काँग्रेसने ‘महादेव’लाही सोडलं नाही; भ्रष्टाचारानं यांनी तिजोरी भरलीय’

छत्तीसगडमधील दुर्ग येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार जनतेला लुटण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी महादेवाचे नावही सोडलेले नाही. दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती, पैशांचा मोठा ढीग सापडला होता. लोक म्हणत आहेत की,’हा पैसा सट्टेबाज आणि जुगारांचा आहे.”
जो त्यांनी छत्तीसगडच्या गरीब आणि तरुणांना लुटून जमा केला आहे. या लुटलेल्या पैशाने काँग्रेसचे नेते आपली घरे भरत आहेत. या पैशाचे कनेक्शन छत्तीसगडमध्ये त्यांच्याकडे जात असल्याचे मीडियामध्ये येत असल्याचे मोदी म्हणाले,’दुबईत बसलेल्या घोटाळ्यातील आरोपींशी त्यांचे काय संबंध आहे, हे येथील सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे. पैसे जप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री का नाराज झाले?’ असा सवालही उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “मी ऐकले आहे की येथील नेते आम्हाला शांत स्वरात संदेश देत आहेत की आम्ही देखील काळजी घेऊ, आम्ही पैसे तुमच्या जागी ठेवू आणि पोलिस पाठवू. या धमक्या तुम्ही कोणाला देत आहात? तुम्ही कोणाला घाबरवत आहात? ही जनता आहे आणि सर्व काही जाणते.” असं म्हणत मोदी यांनी बघेल यांच्यावर निशाणा साधला आहे.





