PM Modi US Visit: पंतप्रधान मोदींचा 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौरा
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यावर, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री म्हणाले, पंतप्रधान मोदी अनेक परदेशी भागीदारांशी चर्चा करतील. ते अमेरिकेतील प्रवासी भारतीयांशी संवाद साधतील. या कालावधीत अनेक उद्योग-व्यवसायातील नेत्यांचीही भेट घेतली जाणार आहे.
पंतप्रधानांचा पहिला मुक्काम राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचे मूळ गाव डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथे असेल. 6वी क्वाड शिखर परिषदही येथे होणार आहे. विल्मिंग्टन येथून पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत. येथे ते ‘समिट ऑफ द फ्युचर’ला संबोधित करतील. 22 रोजी ते प्रवासी भारतीयांशी चर्चा करतील. भारत 2025 मध्ये पुढील क्वाड नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल.
टॅग्स:





