नवी दिल्ली – देशाला दूरसंचार क्षेत्रातील 5 जी सेवेनंतर आता 6 जी सेवेचे वेध लागले आहेत. त्याचे व्हिजन डॉक्युमेंट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते आज नव्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या एरिया ऑफिसेही उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आता जी 20 गटाचे नेतृत्व करीत आहे. या काळात विज्ञान प्रगतीतील विभागीय असमतोल दूर करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने भारत प्रयत्नशील आहे. ते म्हणाले की, दूरसंचार विभागातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे देशातील नागरीकांचे सक्षमीकरण होत आहे.
ते म्हणाले की, भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातून डिजीटल इंडियाची शक्ती प्रदर्शित होत आहे असेही त्यांनी नमूद केले. आज पंतप्रधानांच्या हस्ते ज्या 6 जी तंत्रज्ञानाचे व्हिजन डॉक्युमेंट प्रकाशित करण्यात आले. ते डॉक्युमेंट विविध मंत्रालयाच्या एका गटाने तयार केले आहे. आणि हा गट नोव्हेंबर 2021 मध्ये स्थापन करण्यात आला होता.
Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक
सुरवातीच्या टप्प्यात देशातील शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स, आणि अन्य विभागांना 6 जी तंत्रज्ञानाचे टेस्टबेड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातून या तंत्रज्ञानाचे क्षमता विकसन होईल अशी अपेक्षा आहे.