Independence Day 2024 | देशभरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं आहे. विशेष म्हणजे आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची पीएम मोदी यांची 11 वी वेळ आहे. ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्याच्या परिसरात भारतीय राष्ट्रध्वजावर तसेच ध्वजारोहणासाठी जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्यापूर्वी पीएम मोदी राजघाटवर पोहोचले होते. त्यांनी इथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पीएम मोदी लाल किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. या भाषणात त्यांच्याकडून नेमकी काय घोषणा केली जाते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीच्या या विशेष सोहळ्यात सहा हजार नागरिकांची उपस्थिती आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणात ते आपल्या सरकारची पुढची रूपरेषा स्पष्ट करतील.
PM Modi hoists the national flag at Red Fort on 78th Independence Day
(Photo source: PM Narendra Modi/YouTube) pic.twitter.com/xPmKcWUIIL
— ANI (@ANI) August 15, 2024
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! माझ्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”
सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की ढेरों शुभकामनाएं। जय हिंद!
Independence Day greetings to my fellow Indians. Jai Hind! 🇮🇳
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2024
राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
“संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला, विशेषत: सशस्त्र दलातील आपल्या शूर जवानांना, जे आपला जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करतात, त्यांना शुभेच्छा देते,” अशी सोशल मीडिया पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलीय.
हेही वाचा:
Independence Day LIVE UPDATES । ’40 कोटी भारतीयांनी महासत्तेचा पराभव केला, आज आम्ही 140 कोटी आहोत.’