PM Modi Tamil Nadu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली, श्रीरंगम येथील प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. श्री रंगनाथस्वामी मंदिर हे भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे मंदिर मानले जाते. या मंदिरात पूजा करण्यासाठी पंतप्रधान मोदी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. मात्र, पूजेनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी हत्तीला चारा म्हणजेच प्रसाद दिल्याचे दिसत आहे.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी गायींना चारा दिला होता. यानंतर त्यांनी आता मंदिरात हत्तीला चारा देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर गजराजाचे आशीर्वादही घेतले. पंतप्रधान हत्तीला खायला घालतानाचा २४ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते आधी त्याला खायला देताय आणि हत्तीच्या सोंडेला प्रेमाने हात लावतानाही दिसत आहेत.
#WATCH तमिलनाडु: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने तिरुचिरापल्ली के श्री रंगनाथस्वामी मंदिर में पूजा-अर्चना की। pic.twitter.com/rPlA9prwad
— ANI_HindiNews (@AHindinews) January 20, 2024
पंतप्रधानांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
पीएम मोदींना आशीर्वाद देणाऱ्या हत्तीचे नाव ‘आंदल’ आहे. त्यांनी पंतप्रधानांसाठी माऊथ ऑर्गनही वाजवले. पंतप्रधानांचे आगमन होताच पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मार्गावर मोठी गर्दी झाली होती. पीएम मोदींनीही आपल्या वाहनातून हात फिरवून गर्दीचे स्वागत केले. श्रीरंगम मंदिर हे श्री रंगनाथर यांना समर्पित हिंदू मंदिर आहे. श्रीरंगम मंदिर हे भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल आणि जगातील सर्वात मोठे धार्मिक संकुल आहे.
#WATCH | Tamil Nadu: An elephant at Sri Ranganathaswamy Temple in Tiruchirappalli blessed Prime Minister Narendra Modi and played a mouth organ as PM visited the temple to offer prayers.
PM Narendra Modi is the first prime minister to visit Sri Ranganathaswamy Temple in… pic.twitter.com/3YI22dO0UM
— ANI (@ANI) January 20, 2024
मंदिर कधी बांधले गेले?
रंगनाथस्वामी मंदिर विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असे मानले जाते. मंदिरातील देवतेचे निवासस्थान अनेकदा नाम पेरुमल आणि अढागिया मानवलन म्हणून ओळखले जाते. तामिळमध्ये याचा अर्थ ‘आमचा देव’ आणि ‘सुंदर वर’ असा होतो. भव्य रंगनाथस्वामी मंदिर हे भगवान रंगनाथाचे निवासस्थान आहे, हे भगवान विष्णूचे रूप आहे. त्याचवेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या घोषणांनी पंतप्रधानांचे विशेष स्वागत केले.