“अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान मोदी स्पीडब्रेकर’ – राहुल गांधी
Updated On:

नवी दिल्ली – केंद्रातील मागील यूपीए सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. त्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पीडब्रेकर बनले आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोडले. कॉंग्रेसने गरिबांना मजबूत करून विकासाला गती दिली.
त्याउलट, मोदी काही मित्रांच्या फायद्यासाठी देशाला पोकळ बनवत आहेत. देशवासीयांना धोरणांमध्ये प्राधान्य दिले नाही तर देशाचा विकास अशक्य आहे. खोटा प्रचार केला तरी आर्थिक आघाडीवर भाजप सरकार याआधी कॉंग्रेसने केलेल्या कामगिरीच्या आसपासही नाही.
आकडेच त्याची साक्ष देतात, असे राहुल यांनी सोशल मीडियावरून म्हटले. आर्थिक आघाडीवर दोन्ही सरकारांनी केलेल्या कामगिरीची तुलना करणारा व्हिडीओही त्यांनी जारी केला.





