Pm Modi Russia : ‘सिर पर लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी…’; रशियात पंतप्रधान मोदींनी गायलं गाणं

Pm Modi Russia : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते मॉस्कोच्या वनुकोवो-2 विमानतळावर पोहोचले, तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
सोमवारी रात्री पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. मंगळवारी त्यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. येथे त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-रशिया संबंधांवर प्रकाश टाकला. यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल उपस्थित लोकांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे.
मी माझ्यासोबत 140 कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. तिसऱ्यांदा सरकारमध्ये आल्यानंतर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. भारतीय समुदायासोबतची पहिली भेट इथे मॉस्कोमध्ये होत आहे त्याच दिवशी मी शपथ घेतली की मी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट ताकदीने काम करेन. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
रूस शब्द सुनते ही हर भारतीय के मन में पहला शब्द आता है…भारत के सुख-दुख का साथी, भारत का भरोसेमंद दोस्त।
रूस में सर्दी के मौसम में temperature कितना ही minus में नीचे क्यों न चला जाए…
भारत-रूस की दोस्ती हमेशा plus में रही है, गर्मजोशी भरी रही है।
ये रिश्ता mutual trust और… pic.twitter.com/xktnmxaO9B
— BJP (@BJP4India) July 9, 2024
यावेळी नरेंद्र मोदींनी ‘आवारा’ चित्रपटातील फिर भी दिल है हिंदुस्थानी… या गाण्यातील ‘सिर पर लाल टोपी रूसी…’ही ओळ म्हंटली. त्यानंतर भारतीयांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी…’ असं म्हणत गाण्याला दाद दिली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत कसा बदलत आहे –
भारत बदलत आहे कारण भारताला आपल्या 140 कोटी नागरिकांच्या क्षमतेवर विश्वास आहे. जगभरात पसरलेल्या भारतीयांच्या ताकदीवर त्याचा विश्वास आहे. भारत बदलत आहे कारण 140 कोटी भारतीय आता भारताला विकसित देश बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत.
भारत मेहनत करत आहे. आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 15 टक्के योगदान देत आहे आणि हे योगदान सतत वाढत आहे. भारताचे जागतिक योगदान वाढतच जाईल आणि आव्हानांना आव्हान देणे माझ्या डीएनएमध्ये आहे. असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
1951 साली प्रदर्शित झाला ‘आवारा’ चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीने अजरामर केलेलं हे गाणं राज कपूर यांच्या आवारा चित्रपटातील असून हा चित्रपट 1951 साली प्रदर्शित झाला होता. नर्गिस दत्त आणि राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील देशभक्तीपर हे गीत मुकेश कुमार यांनी गायलेलंल आहे. हे गाणं जुनं असलं तरी नक्कीच एव्हरग्रीन आहे. कारण, या गाण्यातील फिर भी दिल है हिंदुस्थानी हे वाक्य भारतीयांची छातीअभिमानाने फुगवतात.





