काँग्रेस खासदाराकडून आयकर विभागाने केलं करोडोंचे घबाड जप्त ! PM मोदी म्हणाले,”देशातील नागरिकांनी..”

नवी दिल्ली – काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू ( Dheeraj Sahu ) आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २०० कोटी ( 200 cr cash ) रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छाप्यादरम्यान ९ कपाटे नोटांनी भरलेली आढळून आली असून नोटा मोजण्यासाठी मशीन्स मागवाव्या लागल्या. ( Congress MP ) या सर्व प्रकरणावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( PM modi ) देखील भाष्य केले आहे. ( PM Modi on dheeraj sahu)
धीरज साहू हे झारखंडमधले मोठे उद्योगपती आहेत आणि ते मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित आहेत. आयकर विभागाने झारखंड, ओडिशा आणि बंगालमधील समूहाच्या १० ठिकाणी छापे टाकले. बलदेव साहू कंपनीच्या बोलंगीर कार्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या सातपुडा कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकून २०० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. एवढी मोठी रोकड सापडल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाने मशिन वापरून नोटा मोजल्या आणि १५७ बॅगमध्ये भरल्या. बॅग कमी पडल्यावर नोटा ट्रकमध्ये टाकल्या आणि बॅंकेत नेल्या. (Dheeraj sahu raid )
“देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणे ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या पै-पैचा हिशेब द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे” अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के ‘भाषणों’ को सुनें… 😂😂😂
जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है।
❌❌❌💵 💵 💵❌❌❌ pic.twitter.com/O2pEA4QTOj
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2023
कोण आहेत नेमकं धीरज साहू ?
धीरज साहू यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू हे व्यापारी आहेत. साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार राहिले आहेत. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहे. धीरज साहू यांनी 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1978 च्या जेलभरो आंदोलनात ते तुरुंगातही गेले होते. जून 2009 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले.
धीरज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 2020 मध्ये धीरज प्रसिद्धीच्या झोतात आले. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.





