नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुरुवारी(२७ जुलै) राजस्थानला जाणार आहेत. सकाळी सीकरमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल.
दुपारी त्यांची सीकरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते राजकोटला जातील. मोदी दुपारी राजकोट ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देतील. तसेच राजकोटमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
गांधी नगर राजभवनात रात्रीचा मुक्काम असून काही सभा होतील. दुसऱ्या दिवशी (२८ जुलै) सकाळी गांधीनगर येथे महात्मा मंदिर येथे सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान सहभागी होतील.