‘एलॉन मस्क माझे जुने मित्र, DOGE मोहिमेकडून खूप अपेक्षा’ ; पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

PM Modi on Elon Musk। अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील अनेक सदस्यांसोबत आपली भेट झाली असल्याचे म्हटले आहे. ज्यात एलॉन मस्क, तुलसी गॅबार्ड आणि विवेक रामास्वामी यांचा समावेश आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी, या बैठकीत कुटुंबासारखे वातावरण होते, ज्यामध्ये उपस्थित असलेले लोक त्यांच्या कुटुंबासह आले होते.
एलॉन मस्कबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले? PM Modi on Elon Musk।
एलॉन मस्क यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी, “मी मुख्यमंत्री असतानापासून एलॉन मस्क यांना ओळखतो. म्हणजे आमची मैत्री खूप जुनी असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”‘ते तिथे त्यांच्या कुटुंबियांसह आणि मुलांसह होते, त्यामुळे साहजिकच वातावरण उबदार आणि मैत्रीपूर्ण वाटले.’असे म्हटले.
पुढे पंतप्रधान मोदी यांनी, “बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी मस्कच्या DOGE मोहिमेचा उल्लेख केला आणि त्याच्या प्रगतीला पाठिंबा दर्शवला. मोदी म्हणाले, ‘आता त्यांच्या DOGE मोहिमेमुळे ते कसे प्रगती करत आहे याबद्दल खूप उत्सुक आहेत.’ खरे सांगायचे तर, यामुळे मलाही आनंद होतो.
पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानबवरही केले भाष्य PM Modi on Elon Musk।
यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “१९४७ पूर्वी प्रत्येकजण स्वातंत्र्यासाठी खांद्याला खांदा लावून लढत होता. त्यावेळी धोरणकर्त्यांनी भारताची फाळणी स्वीकारली. भारतातील लोकांनी मोठ्या वेदनांनी, जड अंतःकरणाने हे मान्य केले की जर मुस्लिमांना त्यांचा स्वतःचा देश हवा असेल तर तो त्यांना द्या. पण त्याचा परिणामही त्यावेळी स्पष्ट झाला. या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले. पाकिस्तानातून मृतदेहांनी भरलेल्या गाड्या येऊ लागल्या. खूप भयानक दृश्ये होती. पण भारताचे आभार मानण्याऐवजी आणि आनंदाने जगण्याऐवजी, पाकिस्तानने संघर्षाचा मार्ग निवडला. आता एक प्रॉक्सी युद्ध सुरू आहे. ही विचारसरणी नाही, दहशतवाद्यांची निर्यात करण्याचे काम सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानशी असलेले संबंध समोर येतात. ते म्हणाले की,”अमेरिकेत ९/११ ची मोठी घटना घडली. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आश्रय घेत होता. जगाने ओळखले आहे की पाकिस्तान संपूर्ण जगासाठी अडचणीचे केंद्र बनला आहे.” असे म्हणत त्यांनी पाकिस्तनावर टीका केली.





