PM Modi Message: ‘ही सर्वात मोठी परीक्षा…’ ; नेहरूंचा विक्रम मोडीत काढल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
PM Modi Message: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. १० जून रोजी म्हणजे आज त्यांनी देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या व्यक्तीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

PM Modi Message: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. १० जून रोजी म्हणजे आज त्यांनी देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या व्यक्तीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती आणि आज त्यांच्या कार्यकाळाला ४,३९९ दिवस पूर्ण झाले आहेत. यासह, त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला, ज्यांनी सलग ४,३९८ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते.
पंतप्रधान म्हणून हा मोदींचा सलग तिसरा कार्यकाळ आहे. या कामगिरीनंतर, पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे देशाला संबोधित केले आणि लोकसेवा, नम्रता व सुशासन ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर पोस्ट ?
इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “लोकसेवा ही सुशासनाची अंतिम कसोटी आहे”. ते म्हणाले की, “केवळ तीच व्यक्ती जी नम्रता, समर्पण आणि निष्ठेने सातत्याने काम करते, तीच जनतेचा विश्वास संपादन करू शकते. आपल्या संदेशासोबत पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोकही शेअर केला:
“सदानुर्क्तप्राः प्रजपालनत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भुयासि श्रीमशनुते।”
जनसेवा ही सुशासन की सबसे बड़ी कसौटी है। विनम्रता, समर्पण और कर्तव्यनिष्ठा के साथ निरंतर कार्य करने वाला व्यक्ति ही जनविश्वास अर्जित करता है।
सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते॥ pic.twitter.com/mn0Ax0F8hs
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2026
विक्रम कसा मोडला गेला
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १५ ऑगस्ट १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते १३ मे १९५२ पर्यंत एकूण १७३२ दिवस पंतप्रधान म्हणून काम केले. यानंतर, १९५२ मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली.
काँग्रेसने निवडणूक जिंकली आणि संसदीय पक्षाने नेहरूंना आपले नेते म्हणून निवडले. त्यानंतर त्यांनी १३ मे १९५२ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग पंतप्रधान म्हणून काम केले. या कालावधीच्या आधारावर, सर्वाधिक काळ पदावर राहिलेल्या निर्वाचित पंतप्रधानांचा विक्रम त्यांच्या नावावर होता. आता, ४३९९ दिवसांच्या कार्यकाळासह नरेंद्र मोदी यांनी हा विक्रम मोडला आहे.





