Kangana Ranaut : NEET पेपरफुटी प्रकरणी PM मोदींची मोठी घोषणा; खासदार कंगणा राणौत म्हणाल्या “विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संकल्प…”
Kangana Ranaut : मोदींच्या या घोषणेनंतर खासदार कंगणा राणौत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Kangana Ranaut : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे कॅाकरोच जनता पार्टीचे आंदोलन गेल्या ३४ दिवसांपासून सुरू आहे.
या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतरही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. (Kangana Ranaut)
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एस पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. “पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (Kangana Ranaut)
मोदींच्या या घोषणेनंतर खासदार कंगणा राणौत (Kangana Ranaut ) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे. प्रधानमंत्रीजींनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. या घोषणेमुळे देशभरात स्वागत केलं जात आहे, यातून विद्यार्थ्यांप्रती त्यांचा असलेला संकल्प दिसत असल्याचं कंगणा राणौत यांनी म्हटलं आहे. तसेच त्याचं ट्वीट भावनात्मक होतं अशी पुष्टीही कंगणा यांनी जोडली आहे. ही प्रतिक्रिया कंगणा यांनी एनआयसोबत बोलताना दिली.
Manjusha Nagpure: सातत्याने योगाभ्यास हाच निरोगी जीवनाचा मार्ग – महापौर मंजुषा नागपुरे
कंगणा राणौत काय म्हणाल्या? (Kangana Ranaut)

Kangana Ranaut : NEET पेपरफुटी प्रकरणी PM मोदींची मोठी घोषणा; खासदार कंगणा राणौत म्हणाल्या “विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संकल्प…”
कंगणा म्हणाल्या, “पेपर लीक होणं हे आपण बालपणापासून बघत आलोय… हे दोन्ही पातळ्यावर आहे… नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत, पण याविरोधात कोणत्याही सरकारने यापूर्वी ठोस भूमिका घेतली नव्हती. आता यासाठी कडक पाऊलं उचलण्यात आली आहेत. कठोर पाऊल आपल्या प्रधानमंत्र्यांनी उचललं आहे, यातून त्यांनी दाखवून दिलं आहे की विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संकल्प काय आहे.” अशी प्रतिक्रिया कंगणा राणौत यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्वीट केलं? (Kangana Ranaut)
“देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही.”





