PM Narendra Modi : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि वाढत्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 24 तासांत दुसऱ्यांदा महत्त्वाचे आवाहन केले आहे. इंधनाचा वापर मर्यादित आणि विचारपूर्वक करण्यासोबतच शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू करावेत तसेच सरकारी-खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (PM Narendra Modi) गुजरातमधील वडोदरा येथे सरदार धाम वसतिगृहाच्या उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी लहान पण महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर शक्य तितका कमी करावा.” (PM Narendra Modi) यावेळी त्यांनी कारपूलिंग, व्हर्च्युअल मीटिंग्स आणि घरून काम करण्यावर भर दिला. “जिथे शक्य असेल तिथे कंपन्या आणि संस्थांनी पुन्हा वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारावा. शाळा आणि क्लासेसनी ऑनलाईन वर्ग घ्यावेत,” असेही मोदी म्हणाले. (PM Narendra Modi) परदेश पर्यटन टाळा, स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्या पंतप्रधानांनी नागरिकांना सुट्टी, डेस्टिनेशन वेडिंग किंवा पर्यटनासाठी परदेशात जाण्याऐवजी भारतातील पर्यटन स्थळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तसेच विदेशी उत्पादनांऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवावा, असेही त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi) सोन्याची खरेदी पुढे ढकला मोदी यांनी नागरिकांना सध्या सोन्याची खरेदी टाळण्याचा सल्ला दिला. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले. “इराण-अमेरिका युद्ध हे या दशकातील सर्वात मोठे संकट आहे. मात्र, कोरोना काळात जसा भारताने यशस्वी सामना केला, तसाच या आव्हानावरही देश मात करेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. (PM Narendra Modi)