PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! 30 जूनपूर्वी ‘हे’ काम न केल्यास 2 हजार रुपये होणार बंद
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यातीलच अत्यंत लोकप्रिय आणि हक्काची योजना म्हणजे 'पीएम किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Yojana)

PM Kisan Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यातीलच अत्यंत लोकप्रिय आणि हक्काची योजना म्हणजे ‘पीएम किसान सन्मान निधी योजना‘ (PM Kisan Yojana).
या योजनेच्या (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हप्ते जमा झाले असून, आता सर्वजण २३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा २३वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, जर तुम्ही कृषी विभागाने सांगितलेली काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.
जून-जुलै महिन्यात हप्ता जमा होण्याची शक्यता
मागील काही वर्षांमधील हप्त्यांचे वेळापत्रक पाहता, केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) आगामी २३वा हप्ता जून ते जुलै या महिन्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा केला जाऊ शकतो.
परंतु, या योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लाभार्थ्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य केली आहे. कृषी विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. १ जून ते ३० जून या कालावधीत ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
ई-केवायसी (e-KYC) कशी करावी?
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती काही मिनिटांत पूर्ण होते. यासाठी शेतकरी खालील दोन पर्यायांचा वापर करू शकतात:
१. जनसेवा केंद्र (CSC Center) : शेतकरी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा किंवा जनसेवा केंद्रात जाऊन आपल्या ओळखपत्राच्या मदतीने बायोमेट्रिकद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
२.अधिकृत वेबसाईट : शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन स्वतः देखील ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात.
‘फार्मर रजिस्ट्री’ देखील आवश्यक; अन्यथा खते-बियाण्यांना मुकणार!
ई-केवायसी सोबतच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ‘फार्मर रजिस्ट्री’ (Farmer Registry) करण्याचेही आवाहन केले आहे. जर शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्री केली नाही, तर भविष्यात केवळ पीएम किसानचा हप्ताच नाही, तर शासनाकडून मिळणारे अनुदानित खते आणि बियाण्यांचा लाभ मिळण्यातही मोठ्या अडचणी येऊ शकतात. फार्मर रजिस्ट्री पूर्ण करण्यासाठी देखील ३० जून हीच अंतिम मुदत देण्यात आली आहे.
थोडक्यात काय तर जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) २३वा हप्ता आणि शेतीविषयक इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवायचा असेल, तर कोणताही विलंब न करता ३० जूनपूर्वी आपली ई-केवायसी आणि फार्मर रजिस्ट्रीची कामे जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पूर्ण करून घ्या.






