नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत तब्बल 11.17 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. हा अहवाल 31 ऑक्टोबरपर्यंतचा आहे. योजनेअंतर्गत नोंदणी सुरू आहे. तुम्ही शेतकरी आहात आणि या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तत्काळ नोंदणी करून घ्या. अजूनही जवळपास 4 कोटी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्ही घरबसल्या किसान क्रेडिट कार्डसाठी देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया –
सर्वात पहिले तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
एक पेज ओपन होईल. त्यावर तुम्हाला FARMER CORNERS चा पर्याय दिसेल. त्यावर NEW FARMER REGISTRATION येईल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला आधार कार्ड आणि कैपचा टाकण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला CLIk HERE TO CONTINUE वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुम्ही जर अगोदरच नोंदणी केलेली असेल तर तुमची माहिती येईल आणि जर नोंदणी केलेली नसेल तर ‘RECORD NOT FOUND WITH GIVEN DETAILS, DO YOU WANT TO REGISTER ON PM-KISAN PORTAL’ यावर तुम्हाला YES करावे लागेल.