Pro Kabaddi League 2023-24 :- प्रो-कबड्डी लीगमध्ये पुण्यात शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या व स्पर्धेतील 24 व्या सामन्यात हरियाणा संघाने अतीतटीच्या लढतीत पुणेरी पलटण संघाचा 44-39 असा पराभव केला. सामना सुरु झाल्यापासून पहिल्या सत्रात पुणेरी संघाने आघाडी घेतली होती. हरियाणाच्या खेळाडूंना पहिले सत्र संपले तोपर्यंत 24-21 ही पिछाडी भरून काढता आली नाही.
छा गए धाकड़ छोरे 🔥
शानदार जीत हासिल करते हुए गाड़ दिया लठ्ठ 💪⚔#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #PUNvHS #PuneriPaltan #HaryanaSteelers pic.twitter.com/mFjlD3XyVj
— ProKabaddi (@ProKabaddi) December 15, 2023
दुसरे सत्र सुरु झाल्यावर पुणेरी संघाचेच वर्चस्व राहीले. पुणेरी संघाचा कर्णधार अस्लम इनामदार व मोहित गोयातने सरस खेळ केला. मात्र, अचानक सामन्याचे पारडे फिरले. हरियाणाच्या विनयने तब्बल 15 गुण कमावले व मोक्याच्या क्षणी संघाला महवाचे गुण मिळवून दिले. हा सामना नाट्यमयरीत्या हरियाणाकडे झुकला व विजयासह त्यांनी स्पर्धेत आगेकूच केली.
दरम्यान, प्रो-कबड्डी लीगमध्ये पुण्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या व स्पर्धेतील 23 व्या सामन्यात यु मुंम्बा संघाने पाटणा पायरट्सचा 42-40 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव केला आणि 4 सामन्यांमध्ये दुसरा विजय नोंदवला. 3 वेळा माजी चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात दोन्ही संघांची जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र, यु मुंम्बाच्या अमीरमहंमद जफरदनिशने अफलातून खेळ करत सामना पाटणाच्या हातून काढून घेतला.
#PKLSeason10 (#MUMvPAT Match 23) : यु मुंम्बा विजयी; पाटणाचा अवघ्या 2 गुणांनी केला पराभव…
यंदाच्या प्रो-कबड्डी लीगचा पहिला टप्पा अहमदाबादला सुरु झाला. त्यानंतर बंगळुरुचा दुसरा टप्पाही पार पडला. आता शुक्रवारपासून तिसरा टप्पा पुण्यात सुरु झाला. गेल्या दोन मोसमांपासून या स्पर्धेला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यंदाच्या मोसमापासून हे चित्र बदलले. अहमदाबाद, बंगळुरु व पुणे या तीन ठिकाणी मात्र, ईनडोअर मैदाने पूर्ण भरल्याचे दिसत आहे. अहमदाबादनंतरच्या बंगळुरू फेरीत तर चाहत्यांची अलोट गर्दी दिसली. थोड्याफार प्रमाणात पुण्यातही तीच परिस्थिती दिसून आली.