Dabang Delhi K.C. vs U.P. Yoddhas, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या पटना लेगमध्ये आज दोन सामने खेळले गेले. मोसमातील 92 वा आणि दुसरा सामना दबंग दिल्ली विरूध्द यूपी योद्धाज् यांच्यात झाला. या सामन्यात दबंग दिल्लीने यूपी योद्धाजला 36-26 ने पराभूत केले. 10 गुणांच्या फरकाने या विजयानंतर दिल्लीने गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राखले आहे.
योद्धाज़ के ख़िलाफ़ दिल्ली के मुंडों की दबंग जीत 🔥
आशु, मीतू, योगेश की तिकड़ी ने मचाया धमाल 🤩#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #DELvUP #DabangDelhiKC #UPYoddhas pic.twitter.com/J1MqPLZb5t
— ProKabaddi (@ProKabaddi) January 27, 2024
दिल्ली लेगपूर्वी दबंग दिल्लीचा हा शेवटचा सामना होता. दबंग दिल्लीच्या विजयाचे अंतर 10 गुणांचे होते. या विजयामुळे दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
#PKLSeason10 (#PATvPUN Match 91) : पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटणचा सामना बरोबरीत…
याआधी स्पर्धेच्या मोसमातील 91 वा व पहिला सामना पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटण यांच्यात झाला. हा रोमांचक सामना 32-32 असा बरोबरीत सुटला. ही मोसमातील 7वी बरोबरी होती. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर तेलुगू टायटन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाटणा पायरेट्सविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर पुणेरी पलटण अव्वल स्थानावर पोहोचले आहे.