#PKLSeason10 (#HSvTT Match 35) : तेलगु टायटन्सचा अवघ्या एका गुणाने विजय…

Pro-Kabaddi League 2023-24 (Chennai) – प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात तेलगु टायटन्सने हरियाणा स्टीलर्सचा 37-36 असा अवघ्या एका गुणाने थरारक पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रापासूच दोन्ही संघांची तुल्यबळ लढत सुरु होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस तेलगु संघ २५-२४ असा एका गुणाने आघाडीवर होता. दुसरे सत्र सुरु झाल्यावरही ही रंगत कायम राहीली. रेड गुणांमध्ये हरियाणाने सरस कामगिरी केली होती मात्र, टॅकल गुणांमध्ये ते कमी पडले.
టైటన్స్ మొదటి విజయం 🔥🔥
అసలు ఆట ఇప్పుడే మొదలైంది 💪
అన్ని మ్యాచ్ ల అప్డేట్లు పొందండి https://t.co/cfORnVakqn లో, లేదా Pro Kabaddi Official App లో 🙌#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvTT #HaryanaSteelers #TeluguTitans pic.twitter.com/mRCpfHHuTP
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2023
तेलगु संघाच्या १५ रेड गुणांना तोड म्हणून हरियाणाने २१ रेड गुण मिळवले मात्र, टॅकलमध्ये हरियाणाला ९ तर तेलगु संघाला १८ गुण मिळवण्यात यश आले. तेलगु संघाकडून स्टार खेळाडू पवन शेरावतने १० गुणांची कमाई केली. तर त्याला सुरेख साथ देताना अजित पवारने ७ गुण मिळवले.
हरियाणाकडून शिवम पातारेने १२ तर विनयने ९ गुण मिळवले. हा सामना अखेरच्या सेकंदापर्यंत रंगला मात्र, मोक्याच्या क्षणी तेलगु संघाने अफलातीन बचावाचे प्रात्यक्षीक सादर करताना सामना अवघ्या एका गुणाने जिंकला. तेलगु संघाने अतीरीक्त २ गुणही या सामन्यात मिळवताना सर्वबादचेही २ गुण मिळवले.
#PKLSeason10 (#CHEvPAT Match 34) : पाटणा पायरट्सचा तमिळ थलैवाजवर सहज विजय…
इथेच या दोन संघात मोठा फरक दिसून आला. त्यातच हरियाणा संघाला अखेरच्या क्षणी पकड करण्याची नामी संधी होती ती देखील त्यंनी दवडली. त्यांच्या याच निर्णायक क्षणी आलेल्या अपयशाचा लाभ तेलगु संघाने घेतला व सामन्यातील विजयासह स्पर्धेतही आगेकूच कायम राखली.





