जयपुर :- प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी नवा इतिहास घडला. या स्पर्धेतील बंगाल वॉरियर्स व बंगळुरू बुल्स यांच्यात झालेला सामना स्पर्धेच्या इतिहासातील एक हजारावा सामना ठरला. या सामन्यात बंगाल वॉरियर्सने बंगळुरु बुल्सचा 35-29 असा पराभव केला व आपला विजयही एक प्रकारे एतिहासिक ठरवला.
There you go – 1️⃣0️⃣0️⃣0️⃣th Panga done ✅
A landmark match in #PKL finishes with Mighty Mani’s Warriors beating the Bulls by 6 points 👏
The action continues! Follow all the updates 👉 only on https://t.co/cfORnV9MAP or Pro Kabaddi Official App 📲 pic.twitter.com/4f5isryzaS
— ProKabaddi (@ProKabaddi) January 15, 2024
या सामन्यात पहिल्या सत्रात बंगाल संघानेच वर्चस्व राखले व सत्र संपेपर्यंत १९-१२ अशी आघाडी घेतली. या सामन्याना बंगालचा स्टार खेळाडू मणिंदर सिंग याच्याहस्ते नोणेफेक करण्यात आली. त्यानेही या एतिहासिक लढतीत हा मान मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील एक महान खेळाडू अशी त्याची गणना होते करण त्याने स्पर्धेच्य पहिल्याच मोसमात यु मुम्बाविरुद्ध तब्बल १७ रेड गुण मिळवताना विक्रम साकार केला होता.
सोमवारच्या सामन्यातही त्यानेच बंगळुरु संघावर दडपण आणले. त्याची व बंगळुरुच्या भरत या खेळाडूशी झालेली चुरस प्रेक्षणिय होती. मात्र, मणिंदरनेच आपले वर्चस्व सिद्ध करत पहिल्या सत्रात बंगाल संघाला आघाडी मिळवून दिली. दुसरे सत्र सुरु झाल्यावर मात्र बंगळुरुने उलटफेर केला. त्यांच्या भरतने मणिंदरचेही आव्हान मोडून काढले. अफलातून रेड गुण व टॅकल गुणांची नोंद करताना त्याने सामन्यात एकवेळ २६-२६ अशी बरोबरीही निर्माण केली.
#PKLSeason10 ( #HSvCHE Match 71) : हरियाणा स्टीलर्सची आगेकूच; तमिळ थलैवाजवर केली मात…
त्याचवेळी बंगालच्या मणिंदरने सर्वबादचे महत्वाचे गुण मिळवले व सामना पुन्हा रंगतदार स्थितीत आला. मात्र, बंगालकडे अत्यंत आवश्यक ५ गुणांची आघाडी आली. त्यानंतर मात्र, बंगाल संघाने बंगळुरुला फारशी संधी दिली नाही. बंगळुरुच्या खेळाडूंनाही अखेरच्या काही मिनिटांमध्ये सरस खेळ करता आला नाही व त्यांना हा सामना गमवावा लागला.