पिरंगुट -परवाना एकाचा उत्पादन दुसरेच

पिरंगुट – ज्या उत्पादनासाठी या कारखान्याचा परवाना घेतला होता. ते सोडून दुसरेच उत्पादन घेण्यात येत होते. त्यामुळे या दुर्घटनेला प्रथमदर्शनी कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसत आहे, अशी खळबळजनक माहिती कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री कडू यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन याठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे. योग्य त्या चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही कडू यांनी दिली.
मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिली जाईल. मरण पावलेले सर्व सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच; परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या 15 दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.





