पिंपरी | गेल्या आठवड्यापासून कृषी विभागाचे संकेतस्थळ बंद

पिंपरी – गेल्या आठवड्यापासून कृषी विभागाचे राज्यस्तरीय संकेतस्थळ बंद असून, नेमका बिघाड काय झाला, याविषयी अधिकारी वर्गही संभ्रमात आहेत.
hrtq:\\krishi.maharashtra. gov.in / हे कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. पूर्वी त्यात दोष असल्यामुळे जलद माहिती मिळत नव्हती. परंतु गेल्या काही महिन्यात तांत्रिक सुधारणा केल्या गेल्या असून, ते अद्ययावत करण्यात आले आहे. अलीकडेच या संकेतस्थळाचा वापरदेखील वाढलेला आहे. अर्थात, गेल्या आठवडाभरापासून ते उघडत नसल्याची बाब खरी आहे. त्यातील तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
सर्व सेवा ऑनलाइनवर आणल्याची माहिती सांगणार्या कृषी विभागाला स्वतःचीच संगणक शाखा बळकट करता आलेली नाही. या विभागात उच्चशिक्षित मनुष्यबळ व नव्या आवृत्तीची साधने नाहीत. गुणनियंत्रण खात्यात घुसण्यासाठी धडपड चालू असलेले अधिकारी संगणक शाखेत काम करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.





