Pimpri News | तिरंग्याखाली एकत्र आले तळेगाव! ; रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, सीआरपीएफ (जीसी)२४२ बटालियन यांच्या सयुंक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या तिरंगा रॅलीची सुरुवात रोटरीचे पीआर डायरेक्टर नितीन मुळे यांनी हिरवा झेंडा दाखवून मंत्रा सिटी या ठिकाणाहून केली. रस्त्यामध्ये कडोलकर कॉलनीमध्ये सिद्धी कम्युनिकेशनचे बाबा चौरे यांच्या तर्फे फटाके वाजवून व पुष्पवृष्टी करुन या रॅलीचे स्वागत करण्यात आले. मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला.
यावेळी सी आर पी एफ 242 बटालियनचे कृष्णकांत झा, उद्योजक शंकरराव शेळके, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी, किरण ओसवाल, कल्याणी लाडे, बसप्पा भंडारी, धनश्री काळे, दीक्षा वाईकर, सुजाता देव, कविता खोल्लम, सीआरपीएफचे जवान, शालेय विद्यार्थी, रोटरीचे पदाधिकारी व नगर परिषदेचे अधिकारी सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी रितेश फाकटकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले.





