Pimpri News | स्कूल बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – स्कूल बसने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील तिर्थ अवेला सोसायटीसमोरील पार्किंग परिसरात शनिवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.गणेश फांबळे (रा. विशाल चांदेरे, सुस, ता. मुळशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्यांची पत्नी कोमल गणेश कांबळे (वय ४०) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ रमेश राजगुरु (वय ३५, रा. रेखा सोनवणे यांच्या घरासमोर, पौड, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बसचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल कांबळे यांचे पती गणेश कांबळे हे शनिवारी सकाळी ९ वाजता कामानिमित्त घराबाहेर गेले होते.
तेव्हा आरोपी नवनाथ राजगुरु याने कोणतीही दक्षता न घेता नियमांकडे दुर्लक्ष करून बस रिव्हर्स घेतली. या निष्काळजीपणामुळे बसच्या चाकाखाली आल्याने गणेश कांबळे हे गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




