Pimpri News : पिंपरी-चिंचवडच्या वकिलांनी लाल फिती बांधून केली ‘या’ मोठ्या कायद्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनकडून वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सोमवारी लाल फिती बांधुन कामकाज करण्यात आले. नेहरुनगर येथील पुरुष व महिला वकील बंधू-भगिनीं मोठया प्रमाणात सहभागी होत वकील सुरक्षा कायदा मंजूर करावा या मागणीला पाठिंबा दिला.
यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग शिनगारे म्हणाले की, प्रत्येक वकील बंधु व भगिनी पक्षकार आशिलांच्या हितासाठी न्यायाची लढाई लढत असतात, परंतू अनेक वेळा असे आढळून येते की काही पक्षकार यांचे नातेवाईक व कुटुंबातील काही व्यक्तींकडून वकील बांधवांवर हल्ले होतात. त्यांना कुठेतर चाप बसावा व वकिलांना सुरक्षा मिळावी.
यावेळी ॲड. सुनिल कडुसकर, ॲड. नारायण रसाळ, ॲड. प्रमिला गाडे, ॲड. प्रतिक जगताप, ॲड. तेजस चवरे, ॲड.गणेश राऊत, ॲड. स्नेहल लांडगे, ॲड. मराठे, ॲड. सिद्धेश लाड, ॲड. तुषार खरात, ॲड.सागर अडागळे, ॲड. संतोष मोरे, ॲड. चरेगावकर, ॲड. विश्वेश्वर काळजे, असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अजय यादव, सचिव ॲड. संदीप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता कुशलकर, ॲड. खजिनदार ॲड. विशाल पोळ, हिशोब तपासणीस ॲड. प्रेरणा चंदाणी, सदस्य ॲड. पोर्णिमा मोहिते, ॲड. सुषमा पाटील ॲड. आरती कुलकर्णी, ॲड. विजय भोंडे वरील वकिलांचा सहभाग होता.





