Pimpri NCP Protest: “हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी!” पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Pimpri NCP Protest: स्व. अजितदादांच्या पश्चात्य राज्याच्या प्रगतीसाठी राबणाऱ्या महिला नेत्याचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही; शहराध्यक्ष योगेश बहल यांचे वक्तव्य.
Pimpri NCP Protest – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि तत्काळ जाहीर माफी मागण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, वास्तविक राजकारण मध्ये काम करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाने महिलांविषयी नेहमी जबाबदारीने बोलले पाहिजे, आदराने वक्तव्य केले पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, ते नेहमी जपण्याचे त्यांना मान सन्मान देणे, आधी गोष्टी व्हायला पाहिजे. परंतु स्वर्गीय अजितदादांच्या आकाली जाण्याने जे दुःख वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोसळले असताना देखील,
केवळ या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या सक्रिय झाल्या. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने वापरलेली भाषा प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी आंदोलकर्त्यांच्यावतीने शहराध्यक्ष बहल यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे,महिला अध्यक्ष कविता आल्हाट,
कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, माजी महापौर तथा नगरसेविका वैशाली घोडेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे,नगरसेविका तथा युवती अध्यक्ष वर्षा जगताप, नगरसेविका अरुणा लंगोटे, प्रतीक्षा लांगी जवळकर, वैशाली काळभोर, निकिता कदम, दीप्ती कांबळे, माजी नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, संघटक सतीश दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत.





