Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

पिंपरी : लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना तिसर्या टर्ममध्ये संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.
मागील दोन टर्ममध्ये आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने बारणे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बारणे यांची पुरस्कारासाठी निवड केली. बारणे यांच्यासह सुप्रिया सुळे, भर्तृहरी महताब, एन.के.प्रेमचंद्रन यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.





