लंडन : भारताच्या समग्र आरोग्य आणि कल्याण क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करणाऱ्या डॉ. ईशा अग्रवाल यांना गुरुपोर्णिमेच्या दिवशी लंडनच्या संसद भवनात सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मश्री लॉर्ड बॉब ब्लॅकमन, संसद सदस्य (हॅरो पूर्व) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळीघानाचे राजकुमार, एच.आर.एच. प्रिन्स इब्राहिम हे देखील यावेळी उपस्थित होते. या भव्य समारंभात विविध देशांतील मान्यवर, खासदार, शाही प्रतिनिधी आणि जागतिक पातळीवरील विचारवंत उपस्थित होते. संसद भवनात आयोजित झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात, भारताच्या प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारणे हे डॉ. अग्रवाल यांच्यासाठी गौरवाचे आणि अभिमानाचे क्षण होते. भारताची संस्कृती, अध्यात्म, आणि समर्पित सेवाभाव यांचे प्रतिनिधित्व करत डॉ. ईशा अग्रवाल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावला. “समग्र आरोग्य आणि कल्याण सक्षमीकरण” क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य यामध्ये समतोल राखण्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दिला आहे. त्यांची कार्यशैली अनेक तरुण-तरुणींना सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे. डॉ. ईशा अग्रवाल यांनी यापूर्वी देखील विविध आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा, अध्यात्मिक चळवळी आणि महिला सक्षमीकरण उपक्रमांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. याशिवाय, त्या सामाजिक जागृती, नैसर्गिक जीवनशैली, आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत. डॉ . ईशा अग्रवाल यांनी पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना, “ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नाही, तर माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कार्यासाठी मिळालेली आंतरराष्ट्रीयस्तरावरची पोचपावती आहे. भारताचे नाव संसद भवनात घेऊन जाणे हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”असे म्हटले. दरम्यान , त्यांचा हा सन्मान म्हणजे नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे,