Pimpri : अॅसिड पिऊन विवाहितेची आत्महत्या
Updated On:

पिंपरी : पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने बाथरूम मधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली. ही घटना 15 एप्रिल रोजी चाकण मधील पानसरे मळा येथे घडली. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय आनंदा मदने (26, पानसरे मळा, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुली सोबत आरोपी अक्षय मदने याचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह झाला होता. आरोपी अक्षय याने वेगवेगळ्या कारणावरून फिर्यादी यांच्या मुलीसोबत भांडण केले. तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने 15 एप्रिल रोजी बाथरूम मधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली.





