पिंपरी : एकाद्या कल्पनेने ओसाड जागा ही कशी सुंदर आणि विलोभनीय दिसू शकते, हे महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. पिंपळे सौदागरमधील गोविंद गार्डन रोड च्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवर तेथील रहिवासी नागरिकांकडून खूप कचरा टाकला जात होता. मात्र, आरोग्य व बेसिक्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी या ओसाड जागाला सेल्फी पॉईंट तयार केले आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठिकाणी सफाई करून व जुन्या टायरचा, एलइडी लाईट, झाडांच्या कुंड्याचा वापर करून कलाकृती तयार केली. यासाठी त्यांनी कचऱ्यातील टाकाऊ वस्तु पैकी टायर, पुठ्ठा, माठ, टाकाऊ सिमेंटचे पाईप, टाकाऊ लोखंडी बाकडे यांचा उपयोग करून आकर्षक सेल्फी पॉइंट तयार केले. विविध लहान-मोठे आकाराचे टायर वापरून त्यांना रंगरंगोटी करून त्यांच्यावर आरोग्याचे व पर्यावरणाचे विविध संदेश दिले गेले. या उपयोजनामुळे गेल्या काही दिवसापासून येथे कचरा टाकणे तर दूरच उलट लोक तिथे सेल्फी घेत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या उपाययोजनामुळे मागील काही दिवसांपासून तिथे नागरिक कचरा टाकत नाहीत. महापालिका ड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फ्ल्ले, सीएसआय शंकर घाटे, व प्रभाग क्रमांक 28 चे आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, आरोग्य सहाय्यक हर्षद काचा, मुकादम मुरलीधर सोनसळे, राजेश आवळे, संजय गायकवाड बेसिक्स वॉर्ड इंचार्ज स्वराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक्सचे आकाश बंदपट्टे, अनिकेत खरात, समाधान साळुंके, नंदकिशोर वाघमारे, कुंडलिक कांबळे, अक्षय पाटील, सुजित थोरबोले, आकाश मोकळ, प्रकाश गायकवाड, दिनेश चिंचोके, मनीष सवाई, प्रणव कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.