Satara : कराडमध्ये वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी

कराड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार, दि. 8 रोजी करण्यात आले होते.
36 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गंत आयोजित केेल्या या शिबिरात वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुरावे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या चालकांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. वाहन योग्यता नूतनीकरणासाठी आलेल्या सर्व चालक यांची मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक पोकळे, मोटार वाहन निरीक्षक अगवण, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पवार, मोटार वाहन निरीक्षक पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कोळी, बिटले, श्रीमती मोहित, श्रीमती पाटोळे, श्रीमती घार्गे, श्रीमती सगरे, श्रीमती रजपूत व कार्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता .





