Pimpri Dussehra : पिंपरीत दसऱ्याचा भव्य जल्लोष! ७० फुटांचा रावण दहन आणि जय श्रीरामाच्या गजराने दुमदुमलं मैदान

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरीमध्ये यंदाही विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा ७० फुटी रावणाचा पुतळा दहन करण्यात आला. माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्िथत होते.कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कलाविष्कारांनी झाली. कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांच्या व सिनेतारकांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रावणदहनाचा कार्यक्रम पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला.
मेघनाथ, कुंभकर्ण व विशेष आकर्षण असणाऱ्या भव्य ७० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करताच परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला.कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे माजी नगरसेवक विजय शिंदे, निलेश बारणे, प्रसाद शेट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, सचिन ढोबळे, हेमंत फुलपगार, उमेश भामरे, सोपान कुलकर्णी, गणेश वाणी, अभिजित शिंदे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नरेश पंजाबी, मंडलाध्यक्ष अनिता वाळूंजकर, संदीप कापसे उपस्थित होते.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, “दसरा हा केवळ रावणाच्या दहनाचा दिवस नसून, आपल्या मनातील अहंकार, ईर्ष्या आणि दुष्ट प्रवृत्तींचा अंत करण्याची शिकवण देणारा सण आहे.” मागील पंधरा दिवसांत महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले. शेती, माणसे आणि पशुधन महापुरात वाहून गेली. हजारो बांधवांचे संसार रस्त्यावर आले आहेत. पूरग्रस्तांना मदत देण्याच्या भावनेने संदीप वाघेरे मित्र परिवाराने पुढाकार घेतला आणि थेट या भागात दाखल होऊन मदत केली.
सर्वानी आपापल्या पद्धतीने मदत करायला हवी.सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव यांनी केले तसेच नियोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, रुपेश वाघेरे, श्रीकांत वाघेरे, नितीन गव्हाणे, उमेश खंदारे, अक्षय नाणेकर, कुणाल सातव, किशोर येळवंडे, शुभम शिंदे, विठ्ठल जाधव आदींनी केले.





