Pimpri Crime | धक्कादायक! प्रेम संबंधातून तरुणाचा हत्या ; मध्यस्थी करणाऱ्या महिलेवरही हल्ला,आरोपी अटक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – जवळच्या नातेवाईक महिलेसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून नातेवाईक महिलेच्या प्रियकरावर चाकूने वार करून त्याचा खून केला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पि्रयसी महिलेवरही आरोपीने हल्ला चढवून तिला जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) सकाळी भोसरीतील धावडेवस्ती परिसरात घडली.
ब्रिजेश शिवदर्शन राजपूत (वय २१, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. तर, जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रियसी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी नितीनप्रसाद कोरी (वय २६, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश आणि फिर्यादी महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. याच कारणावरून चिडलेल्या आरोपीने शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ब्रिजेश याच्यावर चाकूने पोट व मानेवर वार केले. त्यावेळी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी धावलेल्या महिलेलाही आरोपीने जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.




