Pimpri Crime | आईच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला! ; दोन अल्पवयीन मुलांची धक्कादायक कृती
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या आईच्या प्रियकरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना दापोडी येथे बुधवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोडी येथील जयभीमनगर येथील एका महिलेच्या दोन अल्पवयीन मुलांनी २९ वर्षांच्या तरुणावर हल्ला केला. या तरुणाचे मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे चिडलेल्या मुलांनी तरुणाच्या डोक्यावर, हाताच्या पंज्यावर, पायावर आणि पाठीवर वार केले आहेत. दापोडी पोलीस तपास करत आहेत.





