Pimpri Crime | हॉटेल व्यावसायिकाच्या जीवावर उठले ; लोखंडी रॉडने मारहाण

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – किरकोळ वादातून एका हॉटेल व्यवसायिकावर खुनी हल्ला हल्ला करण्यात आला. ही घटना महिंद्रा कंपनी गेट नं. २ समोर, महाळुंगे एमआयडीसी येथे २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता घडली.दत्ता सुर्यवंशी (वय ४५), महिला आरोपी (वय ४१), आदित्य सुर्यवंशी (वय २१), प्रतिक सुर्यवंशी (वय २१) आणि अल्पवयीन बालक (वय १६, सर्व रा. गणेशनगर, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सूशेन दादाराव गटकळ (वय ३६, रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २८) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या अंडाभुर्जी टपरीवर जेवत असताना आरोपींनी नेपाळी सणाला सुट्टी का घेतली नाही, अशी विचारणा आचारी याला केली.
या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली. थोड्या वेळाने इतर आरोपींना बोलावून फिर्यादी यांना आरोपींनी लोखंडी रॉड व टेबल खुर्च्यांनी हल्ला करत फिर्यादीला गंभीर दुखापत केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




