Pimpri Crime | फ्लिपकार्ट कस्टमर केअरच्या नावाखाली फसवणूक
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – फ्लिपकार्ट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून एका महिलेची १ लाख ३ हजार ५५३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली.अलमास सय्यद अहमद काझी (वय २८, रा. काळेवाडी) यांनी गुरुवारी (दि. २१) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकीकुमार नावाचा मोबाइल क्रमांक धारक, बँक खातेधारक आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून “तुमची कॅश ऑन डिलिव्हरी होत नाही. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा” असे सांगितले. आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर विविध स्कॅनर पाठवून वेगवेगळ्या कारणांखाली फिर्यादीकडून एकूण १ लाख ३ हजार ५५३ रुपये पाठवून घेतले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




