Pimpri Crime | व्यवसायाच्या नावाखाली विश्वासघात ; तब्बल ८० लाखांचा आर्थिक गंडा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भोसरी एमआयडीसी येथील हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनोद वसंत चव्हाण (वय ४१) आणि मनोज वसंत चव्हाण (वय ३९, दोघेही रा. सेक्टर १०, फॉर्च्यून अपार्टमेंट, भोसरी एमआयडीसी) अशी आरोपींची नावे आहेत.
संदिप शंकर गवळी (वय ४६, रा. संत तुकारामनगर मार्ग, विनायकनगर, सावता माळीनगर, बो-हाडेवाडी, मोशी, पुणे) यांनी सोमवारी (दि. २५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१९ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान आरोपींनी फिर्यादीकडून ३० लाख रुपये, तसेच त्यांच्या ओळखीचे रघुनाथ सदाशिव बकाल आणि प्रविण भीमशा विरदे यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये गुंतवले.
मात्र, व्यवसायातून मिळणारी रक्कम व्यवसायाच्या चालू खात्यात न जमा करता आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात वळवून व्यवसाय तोट्यात दाखवून परस्पर बंद केला. तसेच, सुमारे ३० लाख रुपयांचे फर्निचर विकून फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली.




