Pimpri Crime : ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाला बळी; दापोडीत नागरिकाची साडेसोळा लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – ट्रेडिंगच्या नावाखाली एका नागरिकाची साडेसोळा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दापोडी येथे घडली.मुरलीनटराजन (वय ५१ रा. गुजर हाइट्स, दापोडी) यांनी शुक्रवारी (दि. २६) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाइल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २२ जुलै ते २० ऑगस्ट या कालाधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुरलीधरण यांची ऑनलाइन शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर “BOBCAPS GROUP” नावाच्या ग्रुपमध्ये सामील करून bobcapselite.com, bobcapsmax.com, bobcapspro.com या वेबसाईट्सवर खाते उघडण्यास सांगितले गेले.
सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेतले. मात्र नंतर एकूण ६० लाख रुपये जमा झाल्याचा आभास निर्माण करून त्यासाठी अजून ४२ लाख रुपये मागण्यात आले. अखेरीस मुरलीनटराजन यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी दापोडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





