PCMC : रावेत येथील पाइपलाईन फुटली, ऐन दिवाळीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा करणारी 1400 मिलिमिटर व्यासाची पाइपलाईन 26 ऑक्टोबर 2022 रोजी अचानक लिकेज झाली आहे. विभागाने लिकेजदुरुस्ती तातडीने करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अचानक शटडाऊन घ्यावा लागत असून लिकेज दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशी माहिती पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.
*जाहिर निवेदन*
दि. २६ ऑक्टोबर २०२२
*पाणी पुरवठा विभाग*आज दि.२६/१०/२०२२ रोजी
रावेत येथे टप्पा ३ ला पाणीपुरवठा करणारी १४०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाईन अचानक लिकेज झाली आहें. विभागाने लिकेजदुरुस्ती तातडीने करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अचानक शटडाऊन घ्यावा लागत असून लिकेज— PCMC (@pcmcindiagovin) October 26, 2022
या कारणास्तव आज(26 आॅक्टोबर) आणि उद्या (27 आॅक्टोबर) संपुर्ण शहरात सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. उद्या रात्री पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.





