Pimpri : मुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार
Updated On:

वडगाव मावळ : आंबी-वारंगवाडी, मावळ येथील पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचे उद्घाटन रविवारी (दि. ८ जून) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हा सोहळा होणार असून याप्रसंगी डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.
या नवीन रुग्णालयामुळे मावळ परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य सेवेच्या नवीन पर्वाची सुरुवात होत असल्याने या सोहळ्यास नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुष्पलता पाटील रुग्णालय, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, एमआयडीसी रोड जवळ, आंबी- वारंगवाडी, ता. मावळ याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.





