Pimpri : भक्ती-शक्ती उड्डाण पुलाला भगदाड

निगडी : निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिराजवळ भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक जलदगतीने व्हावी, यासाठी महापालिकेने हा पूल उभारला आहे.
भक्ती-शक्ती उड्डाणपूल उभारणीसाठी ११० कोटी रुपये खर्च करण्यात आला. मागील वर्षीदेखील भक्ती-शक्ती उड्डाण पुलाला भगदाड पडले होते. त्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने भक्ती शक्ती उड्डाणपूल स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
तर दर्जेदार काम झाले नसेल तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र नेहमीप्रमाणे नागरिकांच्या मागणीला महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी ज्या ठिकाणी रस्त्यावर भगदाड पडले आहे ते ताबडतोब बुजून त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करून देण्यात यावा.
तसेच भविष्यात उड्डाणपूल ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले जाणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासनाकडून घेण्यात यावी, अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे.





