प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील आयशर ट्रकने ट्रेलरला दिलेल्या धडकेत चालक व क्लिनर जागीच ठार झाले. ही घटना मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर उर्स टोलनाक्याजवळ शनिवारी (दि. २९) पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.राजेश गोविंदन (वय 30, रा. तहरपटी, पेन्नाग्राम, जि. धर्मपुरी, राज्य तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या आयशर ट्रक चालकाचे नाव आहे. पवन गिरीराजशंकर उपाध्याय (वय ३०) व क्लीनर सारासंधिरन गोविंदस्वामी (वय २४, दोघेही रा. पेन्नाग्राम, जि. धर्मपुरी, राज्य तामिळनाडू) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रोशन मनोहर डोगरे (वय 35) यांनी शनिवारी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास आरोपी राजेश गोविदंन याने आयशर ट्रक वेगाने व निष्काळजीपणे चालवून MH-46 CL-1273 या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात पवन उपाध्याय व साथी सारासंधिरन या दोघांचा मृत्यू झाला व वाहनांचे मोठे नुकसान झाले. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.