Gang Arrested : थेरगावात खळबळ! खुनाचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पिस्तुल आणि कोयते जप्त
Gang Arrested : बारणे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात रचला जात होता कट; गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून टोळीला केले जेरबंद.

Gang Arrested – पिस्तुल आणि कोयत्यासह एका तरुणाचा खून करण्याचा कट रचत असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी थेरगाव येथे रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २५) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बारणे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली. ऋषिकेश महादेव चव्हाण (वय २७, रा. थेरगाव, पुणे), ऋषिकेश हरी आटोळे (वय २३, रा. थेरगाव, पुणे),
करण उमेश वाघमारे (वय २४, रा. बिबवेवाडी, पुणे), अमित मधुकर कदम (वय १८, रा. थेरगाव, पुणे), यश राहुल साळवे (वय १८, रा. थेरगाव, पुणे) आणि श्रवण रवी दोडमनी (वय २०, रा. किवळे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश ब्राह्मण यांनी शनिवारी (दि. २५) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी बारणे कॉर्नर थेरगाव येथे विकी रामप्रसाद मल या तरुणाचा खून करण्याचा कट रचण्यासाठी एकत्र जमले होते. या कटाबाबत काळेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





