Pimpri Accident | चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक ; सायकलस्वार वृद्धाचा जागेवरच मृत्यू
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना घटना चाकण-शिक्रापूर रोडवर गुरुवारी (दि. १८) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.तुळशीराम बापू बाडेकर (वय ६३, रा. डवरेवस्ती, बहुळ, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. मारुती रामभाऊ वाडेकर (वय ६३, व्यवसाय – शेती, रा. बरळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी शुक्रवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मयत तुळशीराम हे सायकलवरून चालले होते. ते एस.के. हॉटेलसमोर, चाकण येथे आले असताना अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.


