पिंपरी : दीडशे फूट उंच टॉवरवर दारूड्याचे दहा तासांचे थरारनाट्य

Updated On:
पिंपरी : दीडशे फूट उंच टॉवरवर दारूड्याचे दहा तासांचे थरारनाट्य

पिंपरी – दारूच्या नशेत एक तरुण महावितरणच्या दीडशे फूट उंच टॉवरवर शनिवारी रात्री दहा वाजता चढला. आळंदी पोलीस, महावितरण आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर तब्बल दहा तासांनी त्याची सुखरुप सुटका केली. ही घटना आळंदी जवळील केळगाव येथे घडली.

किशोर दगडोबा पैठणे, (वय 30, रा. वाघोली, पुणे) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण केळगाव येथील महावितरणच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला. याबाबतची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्या तरुणाला वारंवार विनंती केल्यावरही तो खाली उतरत नव्हता.

आळंदी येथील अग्निशामक दल देहू येथील तुकाराम बीजेकरिता गेले असल्याने आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास रविवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान वर्दी दिली. त्यानुसार 54 मीटर उंच शिडी असलेले पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र शिडी लावून त्यास खाली उतरविण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे रेस्क्‍यू रोप, हार्नेस व जंपिंग शीट यांचा वापर करून पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची मनधरणी करून त्यास सकाळी आठ वाजताच्या सुमारास खाली उतरविले.

अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, वाहन चालक रुपेश जाधव, फायरमन सारंग मंगळूरकर, विकास नाईक, अग्निशामक प्रशिक्षणार्थी पृथ्वीराज नलावडे, सतीश भोर, विकास कुटे, सुशील चव्हाण, विकास दाभाडे, पायल नालट यांनी बचावकार्य सुरक्षितरित्या पार पाडले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश पंतोजी यांनी घटनास्थळी हाय टेन्शन लाईनचा विद्युत पुरवठा खंडित केला. पोलीस उपनिरीक्षक गांगड सहाय्यक निरीक्षक गाडेकर व डोईफोडे, कर्मचारी जाधव, रासकर, साळुंखे यांनी रात्रभर पहारा दिला.

आणखी संबंधित बातम्या

Liquor Sales Rules : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी.! आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दारू; प्रशासनाने स्पष्टच सांगितलं....

2026-03-26 17:08:34

Liquor Sales Rules : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी.! आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दारू; प्रशासनाने स्पष्टच सांगितलं....

Thane News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 'एवढ्या' किंमतीचे ड्रग्ज आणि दारू जप्त

2026-01-03 18:22:03

Thane News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 'एवढ्या' किंमतीचे ड्रग्ज आणि दारू जप्त

दारू आणि सिगारेट देण्यास नकार.! रेस्टॉरंट मालकाची हत्या, तिघांना अटक

2025-12-27 21:28:50

दारू आणि सिगारेट देण्यास नकार.! रेस्टॉरंट मालकाची हत्या, तिघांना अटक

दारूच्या घोटासाठी मित्रानेच केला घात.! नागराज मंजुळेंच्या 'झुंड'सिनेमातील कलाकाराची हत्या

2025-10-08 17:46:04

दारूच्या घोटासाठी मित्रानेच केला घात.! नागराज मंजुळेंच्या 'झुंड'सिनेमातील कलाकाराची हत्या

GST on alcohol: 'दारू'वर जीएसटी लागू होणार का? निर्मला सीतारमण यांनी दिले स्पष्ट उत्तर

2025-09-10 19:10:40

GST on alcohol: 'दारू'वर जीएसटी लागू होणार का? निर्मला सीतारमण यांनी दिले स्पष्ट उत्तर