पिंपरीः २१ वर्षीय तरुणाचा मेट्रो स्टेशनवरून उड्डी मारत आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरीः काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून एका तरुणाने उड्डी मारत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या युवकाचे नाव सुजल सुनील मनकर (वय २१) असून घराच्या आर्थिक अडचणीमुळे या युवकाने आत्महत्या केल्याची सांगितले आहे. या युवकाला उपचारांसाठी येथील वायसीएम रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी २४ फेब्रुवारीला साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजल सुनील मनकर या २१ वर्षीय तरुणाने संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी माहिती दिली आहे.
सुजल हा आकुर्डी येथील महाविद्यालयात बीसीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्याचे कुटुंब आणि मित्र रुग्णालयात आले असता पोलिसांनी चौकशी केली. यावेळी आर्थिक अडचणीमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.





