Pimple Gurav: पंढरीच्या विठुरायाचे रांगोळीतून साकारले तेजस्वी रूप; नंदिनी वांद्रे यांच्या कलेचे कौतुक
Pimple Gurav: पंढरीच्या विठुरायाचे तेजस्वी रूप अत्यंत देखण्या रंगसंगतीत साकारण्यात आले

पिंपळे गुरव : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पिंपळे गुरव येथील सौ. नंदिनी संजय वांद्रे यांनी भगवान विठ्ठल, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घडविणारी सुंदर रांगोळी साकारली आहे.
सुमारे अनेक तासांच्या मेहनतीतून तयार करण्यात आलेल्या या रांगोळीत विठ्ठल-रखुमाई भक्ती परंपरेचे प्रतीक असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह पंढरीच्या विठुरायाचे तेजस्वी रूप अत्यंत देखण्या रंगसंगतीत साकारण्यात आले आहे. रांगोळीतील बारकावे, आकर्षक रंगछटा आणि भक्तिमय वातावरण पाहणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस मानला जातो. या निमित्ताने साकारलेल्या या रांगोळीमधून वारकरी परंपरा, संतांचे विचार आणि विठ्ठल भक्तीचा संदेश प्रभावीपणे व्यक्त करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांकडून या कलाकृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, धार्मिक सणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलाविष्कार जपण्याचा हा एक सुंदर प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:





