जिद्द, मेहनत अन् यश! पिंपरखेडच्या सौम्या वरेसह पिंपळे भगिनींची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी
Pune District : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; नवोदय व मंथन परीक्षेतील यशाचीही पुनरावृत्ती

जांबूत – सन २०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय नवोदय परीक्षेत तब्बल ९७.५० टक्के गुण तर मंथन परीक्षेत २८६ गुण मिळविलेल्या आणि तालुक्यात नावलौकिक मिळविलेल्या सौम्या सुनील वरे व आराध्या अनिल पिंपळे या विद्यार्थिनीनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३०० पैकी २६४ गुण तर गौरी विशाल पिंपळे हिने २५८ गुण प्राप्त करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक झाला असून विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. नवोदय परीक्षेत यश संपादन केल्यानंतर पुणे जिल्हातील पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात नुकताच सौम्या हिने आपला प्रवेश निश्चित केला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक लहू गाजरे तसेच मुख्याध्यापक पी.सी बारहाते, लता चव्हाण, बाबाजी घोडे, अरुण गांजे, शांताराम शिंदे, मधुमती गाजरे, पोपट भालेराव, अपेक्षा दाभाडे यांचेही मार्गदर्शन मिळाले असून गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी डॉ.प्रीतम कोकणे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख गणेश काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद बोंबे यांनी अभिनंदन केले.





