पुणे जिल्हा | पिंपळगाव जोगास श्रीकृष्ण नाव देणार

ओतूर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये स्व. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपळगाव जोगा धरणास श्रीकृष्ण जलाशय नाव देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.
ओतूर येथील ग्रामविकास मंडळाच्या विद्यमाने स्व. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांचा 51 वा स्मृती दिन व त्यानिमित्ताने देण्यात येणारा श्रीकृष्ण भूषण पुरस्कार व माजी आमदार स्व. लता नानी तांबे भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आमदार बेनके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, तालुका अध्यक्ष तुषार थोरात, मोहित ढमाले, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, विलास दांगट, विशाल तांबे, विनायक तांबे, शरद चौधरी, माऊली खंडागळे,
सर्जेराव गाढवे, सरपंच डॉ. छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव वैभव तांबे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र डुंबरे, माजी अध्यक्ष माधवराव डुंबरे, आउपस्थित होते.
यावेळी माजी सेवानिवृत्त कक्ष अधिकारी दिलीप धोंडीभाऊ घोलप यांना त्यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच करोना काळातील कामाबद्दल श्रीकृष्ण भूषण पुरस्काराने गौरवले गेले.
तसेच बारामती येथील सामाजिक कार्यकर्ती आणि सावली अनाथालयाच्या संस्थापिका झरीना अहमद खान यांना त्या करीत असलेल्या अनाथ मुलांना माणूस बनवण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी आमदार लता नानी श्रीकृष्ण तांबे भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवले गेले.
यावेळी या दोन्ही व्यक्तींना मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवले गेले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे यांनी, मानपत्र वाचन व सूत्रसंचालन पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी तर सहसचिव पंकज घोलप यांनी आभार मानले.
ओतूर हे माझे माहेर आहे. येथील माणसे आणि येथील माती यांच्याशी माझे घट्ट नाते जोडले गेले आहे. स्व. आमदार लता नानींच्या नावाने दिलेला हा पुरस्कार मला निश्चितच अभिमानास्पद आणि घरातल्या माणसांनी केलेला सत्कार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा पुरस्कार खूप मोठा आहे. – झरीना खान, पुरस्कारार्थी
मला लहानपणापासूनच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची परंपरा लाभलेली आहे. कोणतेही काम करताना प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले तर निश्चितच त्याचे समाधान खूप असते. – दिलीप घोलप, पुरस्कारार्थी





