Sharad Saxena : ज्येष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांचे रुग्णालयातील फोटो समोर; सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Sharad Saxena : ज्येष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांनी नुकतेच रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Sharad Saxena : मनोरंजन विश्वातील कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक सुख-दुःखाचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यामुळे कलाकार आणि चाहत्यांमधील संवादाचे सोशल मीडिया हे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. ज्येष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांनी नुकतेच रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
शरद सक्सेना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातील एमआरआय स्कॅनचे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आगामी उपचारांबाबतही माहिती दिली आहे. कमरेच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेपूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उभ्या स्थितीत एमआरआय स्कॅन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी काळजी व्यक्त करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करत आहेत.
शरद सक्सेना यांनी १९७४ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘बेनाम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदीसोबतच त्यांनी तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली.
View this post on Instagram
१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘डागा’ ही त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. मोगॅम्बोचा राइट हँड म्हणून त्यांनी साकारलेल्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली.
याशिवाय ‘बजरंगी भाईजान’मध्ये त्यांनी करीना कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ‘हेरा फेरी’ चित्रपट मालिकेतील ‘तोतला सेठ’ या भूमिकेनेही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘त्रिदेव’, ‘घायल’, ‘खिलाडी’, ‘सोल्जर’ आणि ‘बागबान’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्येही त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
शरद सक्सेना सध्या ७६ वर्षांचे असून ते चित्रपटसृष्टीत पूर्वीइतके सक्रिय नाहीत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या रुग्णालयातील फोटोंनंतर चाहते त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत.
US Iran War: “अमेरिका-इराण युद्ध २०२९ पर्यंत सुरू राहणार…” ; व्हाईट हाऊसचा धक्कादायक अंदाज





